Friday, April 25, 2025
HomeजळगावMurder ; डोक्यात फरशी टाकून पत्नीचा घेतला जीव

Murder ; डोक्यात फरशी टाकून पत्नीचा घेतला जीव

एरंडोल – Erandole

घरातील कौटुंबिक कारणावरून पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून खून केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील गांधीपुरा परिसरात दुपारी घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पतीला पोलीसांनी अटक केली आहे. हर्षदा किरण मराठे (वय-२७, गांधी पूरा, वखारीजवळ) असे मयत विवाहितेचे नाव असून तर संशयित पती किरण महादू मराठे (वय-३५) यास एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

हर्षदा मराठे या महिला पती किरण महादू मराठे यांच्यासह शहरातील गांधी पुरा भागात वास्तव्याला होत्या. गेल्या काही दिवसांपासून मराठे दाम्प्त्यामुळे कौटुंबिक वाद सुरू होते. सोमवारी १९ जून रोजी दुपारी १ वाजता वाद उफाळून आला. यात सतांपाच्या भरात पती किरण मराठे याने पत्नी हर्षदा मराठे यांच्या डोक्यात घरातील फरशी डोक्यात मारली. यात विवाहिता गंभीर जखमी झाल्या. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीष गोराडे यांनी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह एरंडोल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. संशयित आरोपी पती किरण मराठे याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...