Friday, April 25, 2025
Homeक्राईममाजी उपसरपंचाची धारदार शस्त्राने हत्या

माजी उपसरपंचाची धारदार शस्त्राने हत्या

जळगाव – jalgaon
जळगाव तालुक्यातील कानसवाडा येथे आई-वडीलांच्या डोळ्या देखत एकुलत्या एक माजी उपसरपंच मुलाची छातीत धारदार शस्त्राने वार करीत तीन जणांनी निर्घृणपणे हत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने जळगाव तालुका हादरला आहे.

शुक्रवार दि.21 मार्च रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास युवराज कोळी हा त्याचे आईवडील यांच्यासोबत कानसवाडा शिवारातील शेतात काम करत होता. त्यावेळी संशयित आरोपी भरत पाटील आणि त्याच्यासोबत असलेले देवा पाटील, हरीश पाटील यांनी येऊन धारदार चाकू आणि चॉपरने युवराज कोळी याच्यावर वार केले.

- Advertisement -

दरम्यान छातीवर केलेल्या गंभीर जखमांमुळे युवराज जागेवरच कोसळला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी त्यांचे वडील सोपान कोळी आणि आई याने देखील धाव घेतली. परंतु देवा आणि हरीश या दोघांनी त्याच्या आई-वडीलांना पकडून ठेवले होते. आई-वडिलांच्या डोळ्यादेखलत एकुलत्या एक मुलाचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला.

दरम्यान परिसरातील शेतकरी व गावकर्‍यांनी घटनांस्थळी धाव घेतली. तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते. जखमी अवस्थेत असलेल्या युवराज कोळी तातडीने खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मयत घोषित केले. मुलाच्या मृत्यूची वार्ता कळताच त्याच्या आई आणि वडिलांनी टाहो फोडला. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगी यांनी देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.

मयत युवराज शिंदे गटाचा कार्यकर्ता
मयत युवराज कोळी हे शिंदे गटाचे कार्यकर्ते असून कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच होते. कार्यकर्त्याचा खून झाल्याचे कळल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन नातेवाईकांची भेट घेऊन कुटुंबाचे सांत्वन केले. दरम्यान या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मुख्य आरोपी ताब्यात दोघे फरार
तालुक्यातील कानसवाडा शिवारातील शेतात माजी उपसरपंच युवराज कोळी या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित भरत पाटील याला अटक करण्यात आली असून उर्वरित दोन जणांच्या मागावर पोलीस पथक रवाना झाले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...