Thursday, January 8, 2026
Homeनाशिकएकवीस वर्षीय तरुणाची हत्या

एकवीस वर्षीय तरुणाची हत्या

अज्ञात मारेकर्‍याविरूद्ध गुन्हा दाखल

- Advertisement -

घोटी । प्रतिनिधी Ghoti

YouTube video player

इगतपुरी तालुक्यातील खेडभैरवच्या परदेशवाडीतील तरुणाचा अज्ञात मारेकर्‍यांनी खून केला. घोटी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणांचे वडील नितीन कचरू आगविले यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार समाधान नितीन आगविले, वय 21 वर्षे हा तरुण दि. 21 ऑक्टोबरला रात्री 8 वाजता त्याची पत्नी कोमलला बस स्टँडवर जाऊन येतो, असे घरी सांगून बाहेर गेला होता. रात्रीचे 12 वाजले तरी समाधान घरी न आल्याने त्याची पत्नी कोमलने फोन केला असता मी बस स्टँडवरून निघालो आहे, असे समाधानने सांगितले.

मात्र रात्री दीड वाजून गेला तरी तो घरी न आल्याने त्याचे वडील त्याला शोधण्यासाठी बसस्टँडकडे निघाले. घरापासून 1 किलोमीटर अंतरावर समाधान रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्याला घोटी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी समाधानची तपासणी करून त्यास मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन; वयाच्या ८३...

0
मुंबई | Mumbai ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ (Madhav Gadgil) यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी पुण्यातील डॉ....