Wednesday, October 30, 2024
HomeनाशिकNashik : जुन्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा खून

Nashik : जुन्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा खून

पेठ । प्रतिनिधी Peth

- Advertisement -

पेठ तालुक्यातील कोपुर्ली खुर्द येथे जुन्या भांडणाची कुरापत काढत झालेल्या भांडणाचे पर्यावसन सुरीने वार करत भारत धनराज गवळी (28) यांचा खून झाल्याची घटना घडली.

कोपुर्ली खुर्द येथील मारूती मंदिराजवळ भारत गवळी व मधुकर भुसारे यांच्यात शाब्दिक वादावादी होवुन भारत गवळी यास मधुकरची पत्नी मंगलाबाई हिने पाठीमागून धरून ठेवले तर मधुकर भुसारे याने त्याच्या हातात असलेल्या सुरीने भारत याच्या खांद्यावर व मानेजवळ वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले.

भारत गवळी याचे सासरे पंडीत नामदेव तलवारे रा.कोपुर्ली खु.यांचे फिर्यादीवरून दोघांविरुद्ध पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडक यांनी घटनास्थळी दाखल होत पेठ पोलीसांनी आरोपींना चोवीस तासाच्या आत शिताफीने जेरबंद केले.

याबाबत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत पथवे, पोलीस उपनिरीक्षक कैलास दरगुडे, पोलीस हवालदार रविंद्र तांदळे, मनोज गायकवाड, जाधव, शेख, राऊत आदी अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या