Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : २९ वर्षीय तरुणाची हत्या

Nashik Crime : २९ वर्षीय तरुणाची हत्या

नाशिक । प्रतिनिधी

आग्रा राेडवरील विडी कामगारमध्ये काही महिलांसह सराईतांनी एका तरुणाच्या डाेळ्यात मिरची पूड फुंकारुन हल्ला करत निर्घृण हत्या केली. रविवारी(दि.२४) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असून यात विशांत भोये (वय २९ रा. विडी कामगार शाळेमागे, अमृतधाम) हा मृत पावला आहे.

- Advertisement -

विशांत हा विडी कामगार नगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ मित्रांसमवेत गप्पा मारत होता. यावेळी अचानक आठ ते दहा महिला व सराईत तरुण आले. त्यांनी विशांत व त्याच्या मित्रांच्या डोळ्यात मिरची पूड फुंकारुन हल्ला चढविला. यातील एका संशयिताने विशांतवर कोयत्याने वार केला. यानंतर संशयित पळून गेले. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता, त्यातून खून झाल्याची चर्चा परिसरात आहे. आडगाव पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

घटनेनंतर अमृतधाम परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. काही काळ परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. विशांत याच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात असताना मारेकऱ्यांना जेरबंद करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...