Friday, May 3, 2024
HomeजळगावBreaking रावेरात 46 वर्षीय विवाहित महिलेचा खून

Breaking रावेरात 46 वर्षीय विवाहित महिलेचा खून

रावेर|प्रतिनिधी raver

शहरातील उटखेडा रस्त्यावरील (Saptashrungi Nagar) सप्तश्रृंगी नगरात 46 वर्षीय विवाहितेचा (Murder) खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे. खुनाची माहिती कळताच रावेर (police) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनीता संजय महाजन (46) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

- Advertisement -

उटखेडा रस्त्यावर सप्तश्रृंगी नगरातील रहिवासी असलेल्या सुनीता संजय महाजन (वय-46) या विवाहितेचा डोक्यात लाकडी दांडा मारून खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर संशयीत असलेला महिलेचा (Husband) पती पसार झाला आहे. खुनाची माहिती कळताच (Police Inspector Kailas Nagre) पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सचिन नवले, विजू जवरे आदींनी धाव घेत माहिती जाणून घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या