Saturday, May 4, 2024
Homeनाशिकभांडणात मध्यस्थी करणे महागात; फळविक्रेत्याची हत्या

भांडणात मध्यस्थी करणे महागात; फळविक्रेत्याची हत्या

येवला | Yeola

शहरात फळ विक्रेत्यांचे भांडण सोड़वायला गेलेल्या एकाचा खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशातून येवला येथे वास्तव्य करत हातगाड़ीवर फळ विक्रिचा व्यवसाय करत असलेला मनोजकुमार प्रभुदयाल कुशवाह (ManojKumar Kushwaha) सुरू असलेले भांडण सोडवायला गेला.

भांडण करत असलेला आरोपी ब्रिजेशकुमार रमाशंकर कुशवाह (BrijeshKumar Kushwaha) याला मनोजचा राग आल्याने ब्रिजेशकुमार याने मनोजच्या पाठीमागून अननस कापण्याच्या धारदार चाकूने वार करून त्याची हत्या (Murder) केली.

याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपविभागिय अधिकारी समीर साळवेंसह पोलीस निरिक्षक भगवान मथुरे, सपोनि नितीन खंडागळे आदींनी घटनास्थळी भेट दिली.

मनोजकुमारला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी येवला पोलीस ठाण्यात (Yeola Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या