Tuesday, May 28, 2024
Homeनंदुरबारधडगाव येथे महिलेचा खून

धडगाव येथे महिलेचा खून

मोलगी | वार्ताहर MOLAGI

धडगाव येथे एका महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. दमनीबाई आमश्या पावरा (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा धडगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

धडगाव शहरातील बाजारपेठेलागत एका पत्र्याच्या शेडमध्ये आज बुधवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेच्या डोक्यावर व कपाळावर दगडाने ठेचून मारल्याचे स्पष्ट झाले.

मृत महिलेचे नाव दमनीबाई आमश्या पावरा असून ती खर्डी (ता.धडगाव) येथील रहिवासी आहे. याबाबत गुणाजी आमश्या पावरा यांच्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक तपास पोलीस निरीक्षक इशामुद्दिन पठाण करीत आहेत. तपासासाठी पोलीस यंत्रणेने दिवसभर परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही कॅमेर्‍याची मदत घेऊन तपासाची चक्र वेगाने फिरवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या