Monday, May 27, 2024
Homeजळगावअमळनेरात तरूणाचा तीक्ष्ण हत्याराने खून

अमळनेरात तरूणाचा तीक्ष्ण हत्याराने खून

अमळनेर – प्रतिनिधी Amalner

शहरातील स्टेशन रोड (Station Road) वरिल हशीमजी प्रेमजी संकुलात (Hashimji Premji Sankul) रात्री खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना आज दि २८ रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. खाजगी मालवाहतूक चालक असलेला प्रकाश दत्तू चौधरी उर्फ बापू चौधरी रा जुना पारधी वाडा असे त्या मयत खून झालेल्या ईसमाचे नाव असून पैश्यांच्या वादावरून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

- Advertisement -

सदर व्यक्तीचा धारदार तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला आहे. हशीमजी प्रेमजी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर हा खून झाला आहे. खून कोणी केला हे अद्याप समोर आले नसून हा खून रात्री २ वाजे नंतर झाला असावा. सकाळी सफाई कामगार व खाजगी शिकवणीला आलेल्या मूलांना हा प्रकार दिसून आला.

या घटनेचे वृत्त वाऱ्या सारखे शहरात पसरले रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्यने शाळकरी मूले भयभित झाले या व्यापारी संकूलात खाजगी शिकवणी वर्ग भरतात घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले. शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. खून नेमका का झाला? मयत बापू मध्यरात्री तेथे कसा पोहचला ?या बाबत पोलीसांचा तपास सुरू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या