धुळे – प्रतिनिधी Dhule
शहरातील चाळीसगाव रोड परिसरात युवकाला हाताबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने वार करत त्याचा खून केल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
अब्दुल बाशीत अब्दुल्ला खान असे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत युवकाचे वडील अब्दुल्ला आतीकुर रहेमान खान (रा. जामचा मळा, मुल्ला कॉलनी, धुळे) यांनी चाळीसगाव रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. 9 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील चाळीसगावरोडवरील साबीर शेठ यांच्या कॉम्प्लेक्सजवळ अब्दुल रज्जाक लियाकत खान, इमरान
खान अब्दूल रज्जाक खान, पल्लू अब्दुल रज्जाक खान, इकराम रज्जाक खान व इजार उर्फ राजा रज्जाक खान सर्व (रा. मुल्ला कॉलनी, चाळीसगावरोड, धुळे) यांनी तुझ्या वडीलांनी मिटींग का घेतली या कारणावरुन यांनी मुलगा बाशीत यास पकडुन हाताबुक्यांनी मारहाण केली. तर इमरान खान अब्दूल रज्जाक खान याने त्याच्या हातातील चाकूने मुलगा बाशीत याचे
पोटाचे मागील बाजुस चाकुने मारुन दुखापत करुन खून केला. त्यानुसार वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.