Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रकिरकोळ कारणावरून डिलिव्हरी बॉयचा निर्घुण खून

किरकोळ कारणावरून डिलिव्हरी बॉयचा निर्घुण खून

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मीरा रोड येथील शांती पार्क संकुलातील जांगीड शार्कल येथे एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. अंकुश राज असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी काशीमीरा गुन्हे शाखेने पाच जणांना ताब्यात घेतले आहे…

मयत तरुण जवळच राहत होता आणि एका ई-शॉपिंग कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. आपापसातील वादामुळे त्याची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. हत्येच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडीओ समोर आला असून, त्यात आरोपी तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत.

झिंगाट महिलेचा विमानात धिंगाणा; कपडे काढून क्रू मेंबरला मारहाण

अंकुशला नजीकच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. अंकुशचे एक दिवस आधी काही जणांशी भांडण झाले होते. या घटनेचा हत्येशी काही संबंध आहे का? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या