Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमप्रेयसीची हत्या करून प्रियकर पसार

प्रेयसीची हत्या करून प्रियकर पसार

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या धामधुमीत वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसात दुसरी खुनाची घटना घडली. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍या प्रेयसीचा प्रियकराने खून केला. त्यानंतर प्रेयसीचा मृतदेह रिक्षामध्ये ठेवून रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर उभी करून प्रियकर पसार झाला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. ११) सकाळी काळेवाडी स्मशानभूमीजवळ उघडकीस आला.

शिवानी सोमनाथ सुपेकर (वय २७, रा. जगतापनगर, थेरगाव) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. प्रियकर विनायक आवळे हा पसार आहे. शिवानी हिच्या पतीचे २०१८ मध्ये निधन झाले आहे. शिवानीची आई काळेवाडी स्मशानभुमीजवळ राहाते. तर, संशयित आरोपी आवळे हा विवाहित असून तो पिंपरीत वास्त्व्यास आहे. त्याला २० वर्षाचा एक मुलगा आणि मुलगी आहे. गेल्या दोन वर्षांपासून विनायक आणि शिवानी हे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते.

मंगळवारी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादातून विनायक या मध्यरात्री बारा ते पहाटे तीन या दरम्यान शिवानीचा गळा आवळून खून केला. शिवानीचा मृतदेह रिक्षात ठेवून त्यावर चादर टाकली. त्यानंतर रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर पार्क केली. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र कुराडे, वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हाटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी रिक्षा क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला. त्याने ती रिक्षा आवळे याला भाड्याने दिल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

या खुन प्रकरणात आरोपी निष्पन्न झाला असून पोलीसांचे पथक त्याच्यामागावर आहे. लवकरच तो हाती लागेल.

विशाल गायकवाड (पोलीस उपायुक्त)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...