Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारनऊ वर्षीय बालीकेचा खून ; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

नऊ वर्षीय बालीकेचा खून ; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

नंदुरबार| प्रतिनिधी- nandurbar

अक्क्लकुवा (Akklakuwa) तालुक्यातील हुनाखांब चनवाईपाडा या गावाच्या शिवारात अज्ञात इसमाने ९ वर्षीय (Balika) बालीकेचा खून (murder) करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने महुचे झाडाच्या पाल्याने झाकुन ठेवल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

अक्कलकुवा तालुक्यातील हुनाखांब चनवाईपाडा या गावाच्या शिवारात टेबर्‍या रेवा वसावे यांचे शेत आहे.या ठिकाणी १८ मार्च रोजीचे सकाळी ४ ते दि.१ ९ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या पूर्वी अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने कु . निता उदेसिंग वसावे (वय ९ वर्षे ) रा . हुनाखांब चनवाईपाडा ता. अ.कुवा या बालीकेच्या कपाळावर व चेहर्‍यावर व शरीरावर कोणत्यातरी हत्याराचे सहाय्याने गंभीर जखमा करून जीवेठार मारून

पुरावा नष्ट करण्याचे उद्देश

पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने महुचे झाडाचे पाल्याने झाकुन ठेवले होते. सदरची घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चमकाबाई उदेसिंग वसावे रा . हुनाखांब चनवाईपाडा यांच्या फिर्यादीवरून मोलगी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनि धनराज निळे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या