Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकवणी : दगडाने ठेचून एकाचा निर्घुण खून

वणी : दगडाने ठेचून एकाचा निर्घुण खून

वणी | प्रतिनिधी | Vani

वणी बसस्थानकाच्या (Vani Bus Stand) चौकशी कक्षासमोर अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, वणी येथील बसस्थानकात काल मध्यरात्री एक ते चार वाजेच्या सुमारास एका अज्ञात तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह बसस्थानकाच्या स्वच्छतागृहाच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत काटेरी झाडांच्या बाजूला टाकून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

यानंतर संशयिताने बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक कार्यालयाचा दरवाजा व खिडकीचे गज वाकवून आतमध्ये प्रवेश केला. आपण केलेले कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले असावे म्हणून संशयिताने पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेस लावलेले इन्वर्टर काढून नेल्याचे समजते.

Rahul Kalate : असं कसं झालं? ४४ हजार मतं घेऊनही राहुल कलाटे यांचं डिपॉझिट जप्त

मात्र डीव्हीआर तसाच राहिल्याने त्यातून घटनेचे रेकॉर्डिंग पोलिसांनी हस्तगत करुन संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत, आणि पेठचे उपविभागीय पोलीस अधिकारी फडताळे यांनी घटनास्थळी येत पाहणी केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सोनिया गांधींची प्रकृती खालवली, दिल्लीच्या रुग्णालयात दाखल

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलीस उपनिरीक्षक प्रविण उदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या