धुळे – Dhule
साक्री तालुक्यातील जामदा येथ शेती कामासाठी न विचारता बैलजोडी नेल्याच्या कारणावरून दोन चुलत भावांमध्ये वाद होवून एकाने कुर्हाडीने वार करत दुसर्याचा खून केला. काल रात्री ही घटना घडली. याप्रकरणी निजामपूर पोलिसात एकाविरूध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
रमराज पांडुरंग भोसले (वय 40 रा. जामदे) असे मयताचे नाव आहे. त्यांची बैलजोडी त्याचा चुलत भाऊ लाला उर्फ सजीन निला भोसले हा न विचारता शेतात कामासाठी घेवुन गेला. काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घरी परत आल्यावर रमराजने त्यास विचारणा केली. त्यात दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर सजीन याने कुर्हाडीने रमराजवर वार केले.
उलट्या कुर्हाडीने डोक्यावर व अंगावर मारले. त्याला गंभीर दुखापती करून त्याचा खून केला. अशी फिर्याद मयत रमराज यांची पत्नी लक्ष्मीबाई भोसले यांनी निजामपूर पोलिसात दिली आहे. त्यानुसार सजीन भोसले याच्याविरोधात भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.