Monday, June 24, 2024
Homeक्राईमत्रासाला कंटाळून पित्याकडून मुलाची हत्या !

त्रासाला कंटाळून पित्याकडून मुलाची हत्या !

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

- Advertisement -

त्रासाला कंटाळून पित्याने मुलाची हत्या (Son Murder) केली आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील गोधेगाव (Godhegav) येथे घडली आहे. शिवाजी दादासाहेब जाधव (रा. गोधेगाव) यांच्या शेती वाटपाच्या कारणावरून होणार्‍या भांडण-तंट्याच्या त्रासाला कंटाळून दादा सारंगधर जाधव यांनी मुलगा शिवाजीच्या डोक्यावर मंगळवार (दि 14 मे) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फळीने मारहाण (Beating) करून हत्या (Murder) केली.

दि.18 मे रोजी मृतदेहाचा सर्वत्व दुर्गंधी पसरल्याने गुन्ह्याची उकल उघडकीस आली. शिवाजी यांची आई अलका दादासाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीस ताब्यात घेऊन नेवासा पोलीस ठाणे (Newasa Police Station) येथे भा.द.वि. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्रसिंग ससाने हे करीत आहेत. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या