Saturday, April 26, 2025
Homeधुळेशिरपूरात उसनवारीतून तरूणाचा खून

शिरपूरात उसनवारीतून तरूणाचा खून

धुळे । dhule । प्रतिनिधी

शिरपूरात दारूच्या पैशांच्या (loan of liquor money) उधारीतून व मागील भांडणाच्या कारणावरून (previous quarrels) एकास बेदम मारहाण (Beating one) करीत त्याचा खून (murder)करण्यात आला. ही खळबळजनक घटना काल दि.23 रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

धुळे-दादर एक्सप्रेस रेल्वेची अधिसूचना जारी हस्तीच्या 72 विद्यार्थिनींना राज्य पुरस्कार!

राजु सुदाम कोळी (वय 32 रा. वाल्मिक नगर, शिरपूर) असे मयत तरूणाचे नाव आहे. त्यास दारुच्या पैशाच्या उधारीतून व मागील भांडणाच्या रागातून दि. 23 एप्रिल रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास किस्मतनगर येथील सुंदरवाड़ी रोडावर योगेश कोळी, बंटी कोळी, दीपक कोळी, छोटु कोळी यांनी शिवीगाळ करीत त्यास डोक्यावर, पाठीवर, पोटावर, तोंडावर हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली.

ज्ञानेश्वर भामरे म्हणतात…भाजपाकडे बघून मते दिली, पण त्यांनी गद्दारी केली!मनाई आदेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी 25 जणांविरुद्ध गुन्हा

त्यानंतर राजु कोळी यास घरी आणले तेव्हा त्याच्या कानातून रक्तश्राव होत होता. सायंकाळी राजुला त्याचा भाऊ जेवणासाठी उठवायला गेला असता तो उठला नाही. त्यास शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले.

याबाबत मयताचा भाऊ राकेश सुदाम कोळी याने शिरपूर शहर पोलीस दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवकाळीचा फटका, सामोडेत शेतकर्‍याची आत्महत्याज्येष्ठ नागरिक आहात तर मग ही हेल्पलाईन आहे खास तुमच्यासाठी.. वाचाच

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वन

0
पुणे । प्रतिनिधी Pune जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...