धुळे । dhule। प्रतिनिधी
शिरपूरात तरूणाचा (youth) भरवस्तीत धारदार हत्याराने वार करीत निर्घुण खून (Murder) करण्यात आला. आज सांयकाळी सात वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. उपजिल्हा रूग्णालयात तरूणाच्या नातेवाईंकांसह मित्रांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
रेल्वे खाली आल्याने युवकाचा मृत्यू
राहुल राजू भोई (वय 22 रा. बालाजी नगर, शिंगावे शिवार, शिरपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पोटात धारदार हत्याराने वार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला क्रांती नगर भागातील भद्रा चौक येथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे डॉक्टरांनी तपासणी करून राहुल भोई यास मृत घोषित केले आहे. मयत राहुल याच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. दरम्यान खूनाचे कारण अस्पष्ट असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.