Monday, June 24, 2024
Homeक्राईमNashik Crime News : उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवकाचा खून

Nashik Crime News : उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवकाचा खून

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

- Advertisement -

उपनगर पोलिस ठाणे (Upnagar Police Staion) हद्दीतील रोकडोबा वाडी परिसरात काल (दि.०७) रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ जणांनी एका युवकावर (Youth)पूर्ववैमनस्यातून वार करून त्याचा खून (Murder) केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अरमान मुन्नवर शेख (वय-१८) रा. सुंदरनगर असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोर (Attacker) खून करून फरार झाले. पूर्ववैमनस्यातून वार करून युवकाचा खून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सदर खुनाच्या घटनेने परिसरात एकच दहशत पसरली असून हत्येची बातमी पसरताच परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमा झाली होती.

यावेळी घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड परिसरात (Nashik Road Area) सतत होणाऱ्या खुनाच्या घटनांनी व होत असलेल्या गुन्हेगारीबाबत नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केला आहे. गुन्हेगार सर्रास खुन करून दहशत निर्माण करून पोलिसांना (Police) थेट आव्हान देत आहेत. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या