Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याखुनातील संशयित आरोपींना काही तासातच केले जेरबंद

खुनातील संशयित आरोपींना काही तासातच केले जेरबंद

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत अर्वाच्य भाषा वापरल्याचा रागातून २४ वर्षीय तरुणाचा डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून खून करणाऱ्या ८ विधिसंसंघर्षित बालकांसह तिघां संशयितांच्या अंबड पोलिसांनी अवघ्या तासाभरात मुसक्या आवळल्याची माहिती परिमंडळ २ उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी दिली.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावतानगर येथे सोशल मिडीयावर शिवीगाळ केल्याचा राग मनात धरत प्रत्यांश हॉटेल येथे येत काही संशयितांनी परशुराम बाळासाहेब नजान (२४) याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून खून केल्याची घटना (दि.२५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याघटनेची माहिती समजताच सहाय्यक आयुक्त सोहेल शेख,सहाय्यक आयुक्त गुन्हे वसंत मोरे,अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली,गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ,पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले,सहाय्यक निरीक्षक किशोर कोल्हे,उपनिरीक्षक संदीप पवार,उत्तम सोनवणे, नाईद शेख,सुनील बिडकर,किरण शेवाळे आदींसह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले.

यावेळी पोलिसांनी कौशल्याच्या आधारे ८ विधी संघर्षित बालकांसह ओंकार दिलीप बागुल (१८,रा.कामटवाडा,राजवाडा, नाशिक),वैभव उर्फ गिल्या गजानन शिर्के (२२,रा. गोपाळ कृष्ण चौक,कामटवाडा,नवीन नाशिक ),अमोल बापू पाटील (२३,रा. गोपाळ कृष्ण चौक,कामटवाडा,नवीन नाशिक) यांना सापळा रचून अटक केली. सदर संशयितांनी या घटनेत कुठल्याही प्रकारच्या हत्यारांचा वापर केला नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

सर्व ८ विधिसंघर्षित बालकांना बाल न्यायालयासमोर उभे करण्यात आले. हि कामगिरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली,पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले,किशोर कोल्हे,उपनिरीक्षक संदीप पवार,उत्तम सोनवणे, नाईद शेख,सुनील बिडकर,किरण शेवाळे अंमलदार संजीव जाधव,रवींद्र पानसरे,किरण गायकवाड,राकेश राऊत,संदीप भुरे,जनार्धन ढाकणे,पवन परदेशी,अनिल ढेरंगे,सचिन करंजे,घनश्याम भोये,दिपक शिंदे, समाधान शिंदे,प्रवीण राठोड,अनिल गाढवे,सागर जाधव,नितीन राऊत,संजय विसपुते,योगेश शिरसाट,अशोक आव्हाड.सचिन सोनवणे ,राकेश पाटील, संदीप निर्मळ,सचिन जाधव आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या राबविली.

- Advertisment -

ताज्या बातम्या