Saturday, May 25, 2024
Homeनगरगळा दाबून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

गळा दाबून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एका व्यक्तीला शिवीगाळ, मारहाण करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. नंदकुमार बाजीराव औटी (रा. सहकारनगर, सपकाळ हॉस्पिटलजवळ, नगर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. 28 फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता सहकारनगर येथे ही घटना घडली असून या प्रकरणी 1 मार्च रोजी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

जखमी नंदकुमार औटी यांची पत्नी शोभा नंदकुमार औटी यांनी फिर्याद दिली आहे. योगेश सुर्यभान औटी (रा. सहकारनगर, सपकाळ हॉस्पिटलजवळ, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 28 फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता फिर्यादी शोभा त्यांच्या घरासमोर उभ्या असताना योगेश त्याच्याकडील चारचाकी वाहनातून तेथे आला व त्यांना शिवीगाळ करू लागला.

त्यांनी शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केली असता त्याने वाहनातून कुर्‍हाड काढली व त्यांच्यावर धावून गेला. हा प्रकार पाहून नंदकुमार घराच्या बाहेर आले. योगेशने त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण करून खाली जमिनीवर पाडले. त्यांच्या छातीवर बसून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे नंदकुमार बेशुध्द झाले. फिर्यादी शोभा व त्यांच्या मुलीने योगेशला बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता जीवे मारण्याची धमकी दिलीी.

दरम्यान जखमी नंंदकुमार यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची पत्नी शोभा यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या