Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाMusheer Khan Accident : टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूचा भीषण अपघात, कार...

Musheer Khan Accident : टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूचा भीषण अपघात, कार चार-पाच वेळा पलटली

दिल्ली | Delhi

मुंबईचा क्रिकेटपटू आणि सलामीचा फलंदाज मुशीर खान याचा रस्ते अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईचा स्टार युवा फलंदाज मुशीर खान रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला आहे. इराणी चषकापूर्वी मुंबई संघासाठी हा मोठा धक्का आहे.

- Advertisement -

मुशीर खान व वडील नौशाद खान यांच्यासोबत आझमगड ते लखनौ या मार्गावर प्रवास करत असताना कार अपघाताची घटना घडली. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. मात्र अपघात नेमका कसा झाला. हे अद्याप समजू शकलेले नाही.

या अपघातामुळे त्याला अनेक दिवस मैदानापासून दूर रहावे लागू शकते. या अपघातामुळे त्याला ईराणी चषक क्रिकेट स्पर्धा, तसेच रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा या स्पर्धांमध्ये त्याला काही सामन्यांना मुकावे लागू शकते.

नुकत्याच पार पडून गेलेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत त्याने१८१ धावांची खेळी साकारली होती. या खेळीमुळे त्याने लक्ष वेधून घेतले होते. सर्फराझ खान प्रमाणे भारतीय कसोटी क्रिकेट संघांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी आपली दावेदारी पेश केली होती. मात्र अपघातामुळे त्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो.

मात्र ईराणी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये मुंबई संघांमध्ये त्याची निवड करण्यात आली आहे. संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आले आहे.दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेप्रमाणे ईराणी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपली छाप पाडण्याची संधी होती. दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत त्याने आपली क्षमता दाखवून दिली आहे.

सलिल परांजपे नाशिक.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...