मुंबई | Mumbai
भारतीय संगीत सृष्टीतील एक महत्वाचं नाव म्हणजे संगीतकार ए. आर. रेहमान. रेहमानने आजपर्यंत सर्वोत्तम गाणी भारतीय सिनेसृष्टीला दिली आहेत. याच भारतीय संगीतकाराचा कॅनडा मध्ये अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे.
कॅनडामधल्या एका रस्त्याला संगीतकार ए.आर.रेहमान यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कॅनडामध्ये मरखम नावाचं एक शहर आहे. तिथल्या एका रस्त्याला रेहमान यांचं नाव दिलं गेलं. त्या रस्त्याचं पहिलं नाव बदललं.
ए.आर.रेहमानने स्वत: ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसंच आपल्या ट्वीटसह त्यांनी तिकडच्या महापौरांसह असलेले काही फोटोही शेअर केले आहेत. मरखम शहर, फ्रँक स्कारपिटी आणि कॅनडाच्या नागरिकांनी दिलेल्या या सन्मानाप्रति मी आभारी आहे, असं ट्वीटही रेहमानने केलंय.
याआधी सुद्धा २०१३ मध्ये कॅनडाच्या एका रस्त्याला रहमानचं नाव देण्यात आलं होतं. आता पुन्हा २०२२ मध्ये एका वेगळ्या रस्त्याला पुन्हा रहमानचं नाव दिलं आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
ए.आर.रेहमान सध्या अभिनेते चियान विक्रम यांच्या कोब्रा या चित्रपटात व्यस्त आहेत. हा चित्रपट ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यानंतर ते मणिरत्नम यांच्या चित्रपटातही संगीत देणार आहेत. यासोबतच ते दिग्दर्शनातही पदार्पण करणार असून पहिला चित्रपट मस्कवर ते काम करत आहेत.