Saturday, May 18, 2024
Homeदेश विदेशWagner Group : रशियन खासगी सैनिकांचं पुतीन यांच्या विरोधात बंड! मॉस्कोच्या रस्त्यावर...

Wagner Group : रशियन खासगी सैनिकांचं पुतीन यांच्या विरोधात बंड! मॉस्कोच्या रस्त्यावर उतरले रणगाडे

मॉस्को | Moscow

दीड वर्षांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) नाट्यमय वळण मिळालं आहे. याच दरम्यान रशियासमोर वेगळंच संकट उभे ठाकले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्या विशेष मर्जीतील मानल्या जाणाऱ्या ‘वॅगनर ग्रुप’ने बंड केल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेन युद्धादरम्यान वॅगनर ग्रुपचा म्होरक्या येवगनी प्रिगोझिन आणि पुतीन यांच्यातील वाद तापला आहे.

- Advertisement -

रशियन सैन्यावर वॅगनर ग्रुप हल्ले करतोय. वॅगनर ग्रुप रशियाची ताकत मानला जातो. वॅगनर ग्रुपचे ३० हजार योद्धे लढण्यासाठी सज्ज आहेत. वॅगनर ग्रुपच्या प्रमुखाने रशियाविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. मॉस्कोच्या दिशेने येणारा हाय-वे बंद झाला आहे. रशियन सैन्याची दोन हॅलिकॉप्टर पाडल्याचा दावा वॅगनर ग्रुपने केलाय. रोस्टोवच्या गव्हर्नरने लोकांना घराबाहेर पडू नका, असं आवाहन केलं आहे. दरम्यान ‘वॅगनर ग्रुप’ने शनिवारी सकाळी रशियातील रोस्तोव शहरावर ताबा मिळवला आहे.अंतर्गत कलहामुळे राशियाने पैशांच्या मोबदल्यात सेवा घेतलेल्या लष्कराच्या ‘वॅगनर ग्रुप’चा प्रमुख येवगेनी प्रोगोझिन याने शसस्त्र बंड पुकारण्याचं आव्हान केल्याचा आरोप केला जात आहे.

धक्कादायक! विवाहितेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक अत्याचार

प्रोगोझिनने शनिवारी केलेल्या एका घोषणेमध्ये ‘वॅगनर ग्रुप’चे सैनिक युक्रेनमधून रशियात शिरले असून आता पुढे वाटचाल करत आहेत असं सांगितलं. तसेच रशियन लष्कराविरोधात आपण कोणत्याही थराला जाऊन लढण्यास तयार आहोत असंही प्रोगोझिनने म्हटलं आहे. ‘वॅगनर ग्रुप’ने रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोकडे वाटचाल सुरु केली आहे. मॉस्को सध्या हाय अलर्टवर आहे. येवगेनी प्रोगोझिन आणि अन्य लष्करी अधिकाऱ्यांमध्ये मागील बऱ्याच काळापासून सुरु असलेला अंतर्गत कलह शिगेला पोहोचला आहे. रशियामधील एफएसबी सुरक्षादलाने प्रोगोझिनविरोधातील एक प्रकरण पुन्हा चौकशीसाठी हाती घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. प्रोगोझिनची खासगी लष्करी कंपनी ‘वॅगनर’ ही रशियाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहे असा रशियाचा आरोप आहे. आता प्रोगोझिनला ताब्यात घेण्यासाठी ‘वॅगनर’मधील सैनिकांनी आम्हाला मदत करावी असं आवाहनही रशियाकडून करण्यात आलं आहे. रशियाचं सत्ता केंद्र असलेल्या क्रेमलिन म्हणजेच रशियन सरकारने प्रिगोझिनविरोधात शसस्त्र आंदोलनाचं आवाहन केल्याचा ठपका ठेवल्यानंतर लगेचच त्याला ताब्यात घेण्यासंदर्भातील प्रयत्न सुरु केले आहेत.

Video : …अन् बिबट्याला लोकांनी खायला दिल्या चक्क ‘चपात्या’; प्रकरण पोहोचलं पोलिस ठाण्यात, नेमकं काय घडलं?

- Advertisment -

ताज्या बातम्या