Wednesday, May 22, 2024
Homeनाशिकमविप्र निवडणूक : निफाडकर प्रगतीवर मारणार शिक्का - नीलिमा पवार

मविप्र निवडणूक : निफाडकर प्रगतीवर मारणार शिक्का – नीलिमा पवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत ( MVP Elections )प्रचाराच्या अंतिम टप्प्यात निफाडकरांनी इरादा पक्का करत प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. पिंपळगाव बसवंत ( Pimpalgaon Basvant )येथे झालेल्या मेळाव्यास सभासदांचा उदंड प्रतिसाद लाभल्याने ‘प्रगती’ची विजयाकडे जोरदार घोडदौड सुरु झाल्याचे या मेळाव्यातून दिसून आले. दरम्यान, राजेंद्र मोगल यांनी प्रगती पॅनलला पाठिंबा जाहीर केल्यामुळे ‘प्रगती’ पॅनलचा मार्ग ( Pragati Panel- MVP Election) अधिक सुकर झाला आहे.

- Advertisement -

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव मेंगाणे होते. व्यासपीठावर जेष्ठ नेते श्रीराम शेटे, राजेंद्र मोगल, निलीमाताई पवार, केदानाना आहेर, डॉ. सुनील ढिकले, डॉ. विलास बच्छाव, नानासाहेब महाले, दत्ताकाका गडाख, सुरेश कळमकर, आनंदराव बोराडे, चेतन पाटील, शिवाजीराव बस्ते, साहेबराव मोरे, दिलीप मोरे, सोमनाथ मोरे, पंढरीनाथ देशमाने, भास्करराव बनकर, संपत वाटपाडे, सिंधु आढाव उपस्थित होते.

राजेंद्र मोगल यांनी विरोधाला विरोध न करता विकासासाठी प्रगतीला पाठींबा दिला असून निलीमाताई पवारांचे दुसरे नाव म्हणजे प्रगती असल्याचे त्यांनी सांगितले. मविप्र संस्था व तालुक्याच्या हिताकरिता निलीमाताई व सहकार्‍यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

शेटे म्हणाले, कर्मवीरांचे स्वप्न प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम निलीमाताई व कार्यकारी मंडळाने केले असून शहरासोबतच ग्रामीण भागात देखील गुणवंत शिक्षण दिले जात असून जिल्हाभर सुबत्ता आणण्याचे काम झाले आहे.डॉ पवारांनी व्यावसायिक महाविद्यालय आणून नावलौकिक व आर्थिक स्तर उंचावला.

भास्करराव बनकर यांनी ‘ डॉ वसंतराव पवार गेल्यानंतर निलीमाताई यांनी 12 वर्षात दैदिप्यमान कार्य उभे केले असून नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून होरायझन सारखा ब्रांड त्यांनी जिल्ह्यात निर्माण केला आहे.माजी आमदार शिरीष कोतवाल व राजेंद्र डोखळे यांचा देखील पाठींबा असून ते आपली भूमिका लवकरच मांडतील असे सांगितले.

डॉ. सुनील ढिकले यांनी ‘केजीटूपीजी’ अभ्यासक्रम सुरु करून संस्थेने जिल्हाभर ज्ञानदान केले असून करोनाकाळात जिल्ह्याला आरोग्यसेवा पुरविली.शासनाने त्याची दखल घेतली.निलीमाताईनी संस्था कर्जमुक्त केली.शाखाविस्तार केला.

सचिन पिंगळे यांनी निफाडकरांनी योग्य निर्णय घेऊन विकास करणार्यांच्या हातात संस्था सोपवावी असे सांगितले.

यावेळी ओझार, कोकणगाव, शिरवाडे वणी,पालखेड व खेडलेझुंगे येथे सभासदांच्या पाठींब्यात सभा पार पडल्या. यावेळी सभासदांनी प्रगतीला एकमुखाने साथ देण्याची ग्वाही दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या