Saturday, July 27, 2024
Homeनाशिकमविप्र निवडणूक : कर्मवीरांचा हेतू साध्य करण्यासाठी एकविचारांचे पॅनल निवडून द्या :...

मविप्र निवडणूक : कर्मवीरांचा हेतू साध्य करण्यासाठी एकविचारांचे पॅनल निवडून द्या : शेटे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कारभारामुळे मविप्र संस्थेची ( Maratha Vidyaprasarak Samaj Sanstha )प्रगती झाली असून अर्धे इकडचे अर्धे तिकडचे न करता संपूर्ण पॅनल निवडून अधिक चांगल्या कारभारासाठी निलीमा पवार व सहकार्‍यांच्या मागे आपली मतदानरुपी ताकद उभी करा,असे आवाहन श्रीराम शेटे यांनी मोहाडी येथे केले.

- Advertisement -

प्रगती पॅनलतर्फे ( Pragati Panel- MVP Elections )आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संपतराव जाधव होते.व्यासपीठावर निलीमा पवार,माणिकराव बोरस्ते,डॉ. सुनील ढिकले,डॉ.विलास बच्छाव,शंकरराव कोल्हे,भाऊसाहेब खताळे,शिवाजी बस्ते,दिलीप मोरे,माणिकराव शिंदे,सुरेश कळमकर,नानासाहेब महाले, सचिन पिंगळे,सिंधू आढाव उपस्थित होते.

निलीमा पवार यांचे विद्यार्थी केंद्रबिंदू समजून कार्य सुरु असून दिंडोरी तालुक्यात सर्वोच्च 85 कोटी रुपयांची शैक्षणिक गुंतवणूक संस्थेने केली आहे.अद्ययावत कृषी महाविद्यालय तालुक्याची व संस्थेची ओळख ठरेल.

एकट्या दिंडोरी तालुक्यात 250 एकर जमिन संस्थेने घेतलेली आहे. करोनाकाळात चाचण्या अत्यल्प दरात करून जिल्ह्याला तत्पर सेवा पुरविता आली.परंतु विरोधकांकडून डॉक्टर व नर्सेसने जीव धोक्यात घालून पुरविलेल्या सेवेवर टीका करून त्यांचा केलेला अपमान खेदजनक असून आपण संस्थेच्या हिताला बाधा येईल असे एकही काम आजपर्यंत केले नसल्याचे सांगून आर्थिक शिस्तीसाठी इंटर्नल ऑडीट केल्याचे देखील त्यांनी सांगितले.

माणिकराव बोरस्ते यांनी संस्थेच्या कर्मवीरांनी व समाजधुरिणांनी कायम संस्थाहित जोपासले.संस्थेच्या प्रगतीसाठी राजकारण विरहित समाजकारणाचे धोरण स्वीकारल्याचे सांगितले.

डॉ.ढिकले यांनी भविष्याचा वेध घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने इमारतीची उभारणी केल्याचे सांगितले.माणिकराव शिंदे यांनी समाजाची हानी होऊ न देण्यासाठी गुणवत्तेसाठी प्रयत्न करणार्‍या लोकांना सहकार्य करावे असे आवाहन केले.दिलीप मोरे यांनी विरोधक खालच्या थराला जाऊन चिखलफेक करणार असतील तर तुमचा सातबारा आमच्याकडे आहे असे सांगितले.

सुरेश कळमकर,जेष्ठ सभासद नामदेव आण्णा पाटील, लक्ष्मण देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शहाजी सोमवंशी यांनी केले.दिवसभरात मोहाडी,कोराटे,दिंडोरी, वरखेडा,वणी,पाळे व कळवण या ठिकाणी सभा पार पडल्या.

सभासदांसाठी रुग्णालयात स्वतंत्र फ्लोअर

संस्थेच्या डॉ.वसंतराव पवार रुग्णालयात सभासदांना आरोग्य सेवा देण्यासाठी एक स्वतंत्र 50 बेडचा फ्लोअर उभारून त्यांना उत्तम दर्जाच्या आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जातील,असे आश्वासन निलीमा पवार यांनी मोहाडी येथे दिले.यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ सभासद संपतराव देशमुख होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या