मुंबई | प्रतिनिधी Mumbai
कोरोनाच्या ( Corona ) संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत राज्याच्या कोविड टास्क फोर्सच्यावतीने आज, रविवारी ‘माझा डॉक्टर’ ( My Doctor’ conference) ही ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) परिषदेत सहभागी होणार आहेत.
सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाईल. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने परिषदेचे उदघाटन होईल.
- Advertisement -
राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय, आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती आणि नागरिकांनाही परिषदेत ऑनलाईन सहभागी होता येईल. ही परिषद cmomaharashtra यांच्या ट्विटर, फेसबुक आणि युट्युब https://youtube.com/c/CMOMaharashtra वर देखील पाहता येईल.