Wednesday, May 29, 2024
Homeनगर‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ मधून अंगणवाडी कर्मचार्‍यांना वगळा

‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ मधून अंगणवाडी कर्मचार्‍यांना वगळा

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचार्‍यांवर आधीच्याच जबाबदार्‍यांचा बोजा लक्षात घेऊन करोना प्रमाणे

- Advertisement -

त्यांना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेतून वगळण्याची मागणी जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनने निवेदनाद्वारे केली आहे.

अध्यक्षा कॉ. मदिना शेख, सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके, सहचिटणीस कॉ. जीवन सुरडे यांनी नेवासा तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले की, आरोग्य विभागाने11 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत स्पष्टीकरण केले आहे.

मार्गदर्शक पुस्तिकेत पथकामध्ये अंगणवाडी कार्यकर्ती (आवश्यकतेनुसार महिला व बालकल्याण विभागाची परवानगी घेऊन असा स्पष्ट उल्लेख केला आहे) या पथकाने दररोज 50 घरांना भेटी देऊन टेम्प्रेचर तपासणी, गरज पडल्यास इतर सुविधा देणे, घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रिकोविड, कोविड व पोस्ट कोविड यासंबंधी मार्गदर्शन करावयाचे आहे. ही मोहीम दि.14 सप्टेंबर ते दि.24 ऑक्टोबर अशी तब्बल चाळीस दिवस चालणार आहे.

मात्र, या कामाव्यतिरिक्त अंगणवाडी कर्मचार्‍यांना आहार वाटप, लसीकरण, वजने घेणे, गृहभेटी, 1 सप्टेंबरपासून दहा दिवस पोषण महिना साजरा करणे, परसबाग तयार करणे, आहार विषयक जनजागृती करणे, यांसह नियमितपणाने चालणारी कामे करावी लागत आहे.

त्यामुळे ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत अंगणवाडी कर्मचार्‍यांना सामावून घेण्याची परवानगी महिला व बाल कल्याण विभागाने इतर विभागांना देऊ नये. या योजनेसह एकात्मिक बाल विकास योजनेचे काम एकाचवेळी एकत्रितपणे करणे अशक्य बनले आहे. यापुढील काळात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी सुशीला गायकवाड, माया जाजू, जिवन सुरुडे आदी उपस्थित होते.

एक सप्टेंबरपासून दहा दिवस पोषण महिना साजरा करणे, व्ही.सी.डी.सी. मध्ये दाखल करणे, परसबाग तयार करणे, आहार विषयक जनजागृती करणे, यासह नियमितपणाने चालणारी कामे करायची परिणामी एकाच वेळी हे काम आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे काम शक्य नसून याचा परिणाम वरील कामावर होऊन कुपोषण वाढेल. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी यांना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेतून वगळावे.

– राजेंद्र बावके, सरचिटणीस जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियन

- Advertisment -

ताज्या बातम्या