Saturday, July 27, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात नाफेडकडून कांदा खरेदीची प्रतिक्षा!

नगर जिल्ह्यात नाफेडकडून कांदा खरेदीची प्रतिक्षा!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतकर्‍यांना कुणी वाली आहे की नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण एकीकडे मेथी, कोथिंबीर उत्पादक शेतकर्‍यांचे हाल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कांद्याचे दर पडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

- Advertisement -

अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडकडून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरु होईल, अशी माहिती विधीमंडळात दिली होती. फडणवीसांनी गुरुवारी (दि.2) याबाबतची माहिती दिली होती.

प्रत्यक्षात मात्र, बाजार समित्यांना याबाबत काहीही कळवलेले नाही. तर नगर जिल्ह्यात अद्याप नाफेडच्यावतीने कांदा सुरू करण्यात आला नसल्याचे नाफेडचे नाशिक विभागीय सहायक व्यवथापक सुशील कुमार यांनी ‘सार्वमत’ ला दिली.

दरम्यान, नगर जिल्ह्यात बाजार समितीत्यांमध्ये नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली नसल्याने समिती आणि शेतकर्‍यांमध्ये संभ्रम आहे. तर नाशिक जिल्ह्यात नाफेड आणि काही फ्रार्मा प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू असून नगर जिल्ह्यात अद्याप फ्रार्मा प्रोड्युसर कंपन्यांदेखील कांदा खरेदीसाठी परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात येणार्‍या कांद्याची कांद्याची प्रतवारी ठरविण्यात आली आहे. यात 45 ते 55 मिलिमीटर आकाराचा कांदा असावा, त्यासह रंग उडालेला नसावा. लाल रंग असावा, कांद्याला विळा लागलेला नसावा, आकार बिघडलेला, पत्ती गेलेला कोंब फुटलेला कांदा नसावा, असे निकष लावण्यात आले आहे.

त्याबरोबरच आधार कार्ड पॅन कार्ड, बँक पासबुक, 7/12 खरीप हंगाम पीक पेरा असावा असे असंख्य नियम घालून देण्यात आले आहेत. त्यातच आज कांद्याची विक्री केल्यानंतर साधारणपणे 8 दिवसांनी शेतकर्‍यांना पैसे मिळणार आहेत. नाफेडकडून कांद्याची खरेदी कधी होणार असा सवाल शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे. कारण उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिल्यानंतरही अद्याप खरेदी सुरु झाली नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे. दिवसेंदिवस कांद्याच्या दरात घसरण होत आहे. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसत आहे. अशातच आता सरकारने कांद्यावरही फुलपट्टी लावली आहे. दरम्यान, नाफेडचे नाशिक विभागाचे सहायक व्यवस्थापक सुशील कुमार यांनी पुढील आठवड्यात तीन ते चार दिवसांनी नगर जिल्ह्यात नाफेडच्यावतीने कांदा सुरू होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या