Wednesday, May 13, 2026
Homeक्राईमAhilyanagar : नागापूर परिसरात बनावट ब्रँडेड शाम्पू विक्रीचा पर्दाफाश

Ahilyanagar : नागापूर परिसरात बनावट ब्रँडेड शाम्पू विक्रीचा पर्दाफाश

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एमआयडीसी पोलीस व कंपनीच्या प्रतिनिधींनी नागापूर येथील सह्याद्री चौक परिसरात छापा टाकून बनावट ब्रँडेड शाम्पू विक्री करणार्‍याला पकडले. या कारवाईत नामांकित कंपन्यांच्या बनावट लेबलांचा वापर करून विक्रीसाठी ठेवलेला सुमारे 60 हजार 316 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शानमोहम्मद पप्पूखान आलबी (वय 25, रा. इस्लामनगर, ता. सादाबाद, जि. हाथरस, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. किरीत गुणवंतराय पंड्या (वय 54, रा. विरार पश्चिम, ठाणे) यांनी सोमवारी (11 मे) फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

सदरची कारवाई 9 मे रोजी सायंकाळी करण्यात आली. शानमोहम्मद पप्पूखान आलबी हा नागापूर येथील सह्याद्री चौक परिसरात बनावट ब्रँडेड शाम्पूची विक्री करत असल्याची माहिती फिर्यादी पंड्या यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार 9 मे रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी संशयित आरोपीकडून हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीचे क्लिनिक प्लस व डव्ह तसेच पी अँड जी कंपनीचे हेड अँड शोल्डर्स या ब्रँडच्या बाटल्यांमध्ये अज्ञात रासायनिक मिश्रण भरून त्या अस्सल शाम्पूप्रमाणे ग्राहकांना विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून विविध आकारांच्या शाम्पूच्या बाटल्या जप्त केल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 60 हजार 316 रूपये इतकी आहे. पोलीस अंमलदार राकेश खेडकर अधिक तपास करीत आहेत.

बनावट ट्रेडमार्क व लेबल
प्राथमिक तपासात संशयित आरोपी हा बनावट ट्रेडमार्क व लेबलांचा वापर करून ग्राहकांची तसेच संबंधित कंपन्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. तसेच संबंधित शाम्पूमध्ये वापरण्यात आलेले रासायनिक मिश्रण मानवी आरोग्यास अपायकारक असू शकते, अशीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दोन महिन्यांपूर्वीच विधानपरिषद मतदारांची माहिती निवडणूक आयोगाला सादर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यात पुन्हा एखादा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्यानंतर आता विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनाआधी विधानपरिषदेच्या...