अहमदनगर (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या फेर्यात अडकलेल्या नगरकरांसाठी नगर अर्बन बँकेने आज गुड न्यूज दिली आहे. कर्जाच्या व्याजदारात आज बँकेने 1 टक्क्याची कपात केली. वर्षभरात बँकेने कर्ज व्याजात दोन टक्के कपात केली.
अहमदनगर जिल्ह्यामधील सर्वात मोठ्या मल्टिस्टेट शेड्युल्ड , सहकारी बँक असलेल्या नगर अर्बन को-ऑप बँकेने कोरोनाच्या संकटाच्या पार्श्ववभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन मध्ये ग्राहकांना आर्थिक आधार देण्यासाठी कर्ज व्याजदरांमध्ये कपातीचा निर्णय घेतला. 110 वर्षांची गौरव शाली परंपरा असलेल्या बँकेच्या या निर्णयामुळे लाखो कर्जदारांना याचा फायदा होणार आहे. 1 जानेवारी 2020 रोजी बँकेने 1 टक्का व्याजदर कमी केला होता. आज 1 जुलैपासून पुन्हा त्यात एक टक्क्याने कपात करण्यात आली. 0.50 नियमीत तर नियमित कर्जाचे हफ्ते फेडणार्या कर्जदारांसाठी 0.50 टक्के रिबेट दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे.
रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी मार्च महिन्यामध्ये रेपो रेट 0.75 टक्के व मे 2020 मध्ये 0.40 टक्के कपात केलेली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर करताना बँकांनी शक्य तितक्या लवकर कर्ज व्याजदर कामी करावेत असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत नगर अर्बन बँकेने सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर जानेवारी 2020 ते जुलै 2020 पर्यंत साधारण 2.00 टक्क्यांनी कमी केले आहेत.
सभासद, ठेवीदारांनी, कर्जदारांनी दाखवलेला विश्वास आणखीन वृद्धिंगत करत नवीन ठेवी बँकेमध्ये ठेवून वरील योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक सुभाष चंद्र मिस्रा व व्यवस्थापकीय समितीने केले आहे.
बँकेने 1 ते 10 वर्षाचे कालावधीसाठी अखंड ठेव योजना कार्यान्वित केली आहे. निर्धारित व्याजदरापेक्षा 0.15 ते 0.25 टक्के अधिक व्याजदर या योजनेतील ठेवींवर देण्यात येत आहे. याबरोबरच एक लाख रुपयांपर्यंत ठेवींसाठी असलेले विमा संरक्षण आता पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी वाढविण्यात आलेले आहे .