Wednesday, May 22, 2024
Homeनगरदुचाकी चोरीने नगरकर त्रस्त

दुचाकी चोरीने नगरकर त्रस्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर व उपनगरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. एमआयडीसी, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून

- Advertisement -

तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. दुचाकी चोरीला जाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. पोलीस दप्तरी दररोज दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद केली जात आहे. शहरातून दररोज दोन ते तीन दुचाकी चोरीला जात आहे.

संदीप दिलीप दहिवाळे (वय- 30 रा. कल्याण रोड, नगर) यांची दुचाकी (क्र. एमएच- 16 बीक्यू- 5416) सावेडी येथील बजाज शोरूम समोरून चोरीला गेली. ही घटना दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान घडली.

अज्ञात चोरट्यांनी केवळ आर्धा तासातच दहिवाळे यांची दुचाकी लंपास केली. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यवान सुनील सातदिवे (वय- 29 रा. नवनागापूर) यांची दुचाकी (क्र. एमएच- 16 डब्ल्यू- 6224) त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरीला गेली. रात्रीच्या वेळी ही चोरीची घटना घडली. सातदिवे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिंगार पोलीस ठाणे हद्दीतून 70 हजार रूपये किंमतीची दुचाकी (क्र. एमएच- 16 बीडी- 7199) चोरीला गेली. दत्ता संजय साबळे (वय- 21 रा. सोलापूर रोड, नगर) या युवकाची ही दुचाकी होती. सोलापूर रोडवरील चौधरीनगरमध्ये साबळे हे राहतात. त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर पार्क केली होती. रात्रीच्या अंधारात त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी साबळे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या