Thursday, May 15, 2025
Homeनगरनगर शहरात डॉ. आंबेडकर यांचा 28 फुटी पूर्णाकृती पुतळा

नगर शहरात डॉ. आंबेडकर यांचा 28 फुटी पूर्णाकृती पुतळा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात असलेल्या संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासारखाच पूर्णाकृती पुतळा अहिल्यानगर शहरात उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या पुतळ्याचे अनावरण येत्या 10 एप्रिलला करण्यात येणार आहे. महापालिकेव्दारे 75 लाख रूपये खर्चून स्टेशन रस्त्यावरील मार्केट यार्ड चौकात सुमारे 28 फुटी (पुतळा दहा फूट व चौथरा 18 फूट) पुतळा उभारण्यात येणार आहे. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते 10 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे या पुतळ्याची उभारणी होत असून यानिमित्ताने त्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे. नगरमधील आंबेडकर प्रेमींकडून आ. जगताप यांच्याविषयी याबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे. अनावरण समारंभानंतर प्रसिध्द गायक आनंद शिंदे यांची संगीत मैफल येथे होणार आहे. नगरमधील मार्केट यार्ड चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. याच पुतळ्याच्या जागी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी आंबेडकर प्रेमींची होती. त्याआधी इम्पिरियल चौकातील पशुसंवर्धन विभागाच्या जागी वा नगर शहरात अन्य कोठेही हा पुतळा उभारण्याचे आ. जगतापांनी सुचवले होते. मात्र, आंबेडकर प्रेमींनी आहे त्याच जागी पूर्णाकृती पुतळा करण्याचा आग्रह धरल्याने तेथे तो आता उभारला जात आहे. या 28 फूट उंचीच्या या प्रकल्पात सर्वोच्च न्यायालयात जसा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हातात संविधान प्रत असलेला पूर्णाकृती पुतळा आहे, अगदी तसाच 10 फुटी पुतळा करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानंतर नगरमध्येच असा पुतळा होत आहे.

पुणे येथील शिल्पकार नवीन शेगमवार यांनी हा पुतळा केला आहे. त्यासाठी 15 लाख 76 हजार रूपये खर्च आला आहे. तर पुतळ्याखालील 18 फुटी चौथरा व परिसराचे सुशोभीकरण 55 लाख 76 हजारात करण्यात आले आहे. पुतळा व चौथरा मिळून 72 लाख 55 हजारात हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. येत्या दोन दिवसात पुण्याहून पुतळा नगरला आणला जाणार असून, तो चौथर्‍यावर बसवला जाणार आहे व त्यानंतर 10 एप्रिलला त्याचे अनावरण होणार आहे. या पुतळ्याजवळच सध्याचा अर्धाकृती पुतळा बसवला जाणार आहे. 14 एप्रिलला डॉ. आंबेडकर जयंती व 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी येणार्‍या आंबेडकर प्रेमींना अभिवादनासाठी अर्धाकृती पुतळा येथेच बसवला जाणार आहे.

मार्केट यार्ड चौकातच डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जावा यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती करण्यात आली होती. या समितीतील सदस्य संभाजीराव भिंगारदिवे, सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुमेध गायकवाड, रोहित आव्हाड, किरण दाभाडे, सुनील क्षेत्रे, कौशल गायकवाड, सुनील शिंदे, प्रा. जयंत गायकवाड, विशाल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, संजय जगताप, सिध्दार्थ आढाव, प्रशांत गायकवाड, विजय गायकवाड, गौतमा भिंगारदिवे आदींसह आ. जगताप यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून पुतळा, चौथरा, नवीन संसद भवनाच्या प्रतिकृतीसह परिसर सुशोभिकरण, संरक्षण भिंत, बगीचा व अन्य आवश्यक सुविधा येथे करवून घेतल्या आहेत. 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता लोकजनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख व केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते पुतळा अनावरण होणार असून, यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीतील राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

विचारांचा वारसा जपणार
अहिल्यानगरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागील 30 ते 32 वर्षापासून आंबेडकर प्रेमी जनतेची मागणी होती. ती स्वप्नपूर्ती आता होत आहे. डॉ. आंबेडकरांचा पुतळा नगर शहराच्या वैभवात भर घालणारा ठरेल व त्यांच्या विचारांचा वारसा जपत नगर शहराचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास आ. जगताप यांनी व्यक्त केला. या पुतळ्याच्या अभिवादनासाठी देशभरातून येणार्‍या आंबेडकर प्रेमींच्या निवास व अन्य सुविधांसाठी नवीन टिळक रस्त्यावरील आंबेडकर स्मारकाचे लवकरच नूतनीकरणही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...