Tuesday, May 27, 2025
HomeनगरRain News : नगरमध्ये पावसाने दाणादाण, सीना नदीला पूर, वाहतूक थांबवली

Rain News : नगरमध्ये पावसाने दाणादाण, सीना नदीला पूर, वाहतूक थांबवली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून नगरसह जिल्ह्यात (Nagar) सर्वत्र अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडत आहे. या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून दणादण उडाली आहे. नगर शहरातील सीना नदीला (Sina River) मंगळवारी पुन्हा पूर (Flood) आला. या पुरामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. अवकाळी पावसामुळे शहरातील नाले सफाईचा बोजवारा उडाला असून मनपा कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. शहरात सुमारे तीन तास जोरदार पाऊस झाला. केडगावमध्ये (Kedgav) नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. आनंदऋषी हॉस्पिटलसमोर मोठे झाड कोसळून चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले.

यामुळे काही वेळ वाहतूक बंद पडली होती. नगर शहरात रस्त्यांची कामे अपूर्ण असून शहरात पडणार्‍या सततच्या पावसामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यावर ठिक ठिकाणी पाणी साचले आहे. भुयारी गटाच्या कामामुळे रस्त्यावर चिखल (Mud) झाला आहे. नगर शहर व नगर तालुक्यात रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने सीना नदीला पूर (Sina River Flood) आला होता. सोमवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. परंतु सोमवारी रात्री जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे सकाळी सीना नदीला पुन्हा पूर आला. त्यामुळे वाहतूक झाली होती. एसटी बस, दुचाकी वाहन चालकांना पुलावरील पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागली.

दिल्लीगेट, आनंदी बाजार, आशा टॉकीज, पटवर्धन चौक परिसरात रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. मुसळधार पावसामुळे सीना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. कल्याण महामार्गावरील (Kalyan Highway) छोटा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. मध्य शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनची कामे सुरू आहेत. पटवर्धन चौक, आनंदी बाजार, लक्ष्मी कारंजा, गांधी मैदान परिसर, आशा टॉकीज चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दिल्लीगेट परिसरातही पाणी साचले होते. माळीवाडा परिसरात रस्त्याच्या कामामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

त्यामुळे मार्ग शोधताना नागरिकांना कसरत करावी लागत होती. सर्जेपुरा परिसरातील काही सखल भगात पाणी साचल्याने दुकानांमध्येही पाणी शिरले होते. सावेडी (Savedi) उपनगर परिसरात अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. गायकवाड कॉलनी, रासने नगर चौकातील अमोल विहार अपार्टमेंट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांना घरातून बाहेर येतानाही कसरत करावी लागत होती. तसेच, केडगाव येथील अमरधाम परिसर, चिपाडे मळा, सोनेवाडी रोड येथे उड्यावरील रस्ते पाण्याखाली गेले होते. प्रेमदान चौक व नगर पुणे महामार्गावरही (Nagar Pune Highway) पाणी साचले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत करा – काँग्रेस...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai राज्यातील शेतकरी (Farmer) संकटाचा सामना करत असताना मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. गेल्या दोन दिवसात राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे...