Thursday, June 13, 2024
Homeनगरअज्ञात वाहनाच्या धडकेत काष्टी येथील दोघे ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत काष्टी येथील दोघे ठार

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

- Advertisement -

तालुक्यातील अहमदनगर-दौंड रस्त्यावरील शिरसगाव बोडखा शिवारात सोमवारी (दि.18) रात्री झालेल्या अपघातात काष्टी येथील दोन युवक ठार झाले आहेत. या घटनेमुळे काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.

सचिन नितीन ठुबे (17) व आकाश ज्ञानेश्वर ढगे (26) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. सदर घटनेबाबत महेंद्र सुपेकर यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काष्टी (पुनर्वसन) येथील राहणारे सचिन व आकाश हे दोघे तरुण दुचाकीवरून सोमवारी रात्री काष्टीकडे येत असताना अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामुळे ते दोघे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

त्यानंतर लोकांनी मयत तरुणांच्या कुटुंबियांना या दुर्घटनेबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात पाठवले. गणपती बसण्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या