अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
भरधाव वेगातील कार झाडावर आढळून झालेल्या भीषण अपघातात नगरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. नगर- दौंड महामार्गावरील पांजरपोळ संस्थेजवळ काल (सोमवारी) दुपारी ही घटना घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातात कारचा चक्काचूर झाला असून, अपघात नेमका कसा झाला, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
साहिल सादिक शेख (रा. बुरूडगाव रस्ता), संतोष मोरे (रा. चिपाडे मळा) अशी मयतांची नावे आहेत. तर विकी राजू कांबळे (वय 22 रा. रांजनी माथणी, ता. नगर), तेजस राजेंद्र ठोंबे (रा. खांडके) व आणखी एक अशा तिघांचा जखमींमध्ये समावेश आहे.
कोठला परिसरातील जुगाराचा डाव मोडला
काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून पाच जण नगर – दौंड महामार्गावर नगरच्या दिशेने येत होते. भरधाव वेगात असलेल्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटून कार विरूध्द दिशेला जाऊन मोठ्या झाडावर आदळली. यात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. त्यातील दोघे जागीच ठार झाले. कार भरधाव वेगात असल्याने जोराची धडक होऊन झाडाची मोठी फांदीही तुटून पडली, असे घटनास्थळी उपस्थितांनी सांगितले.
‘त्या’ मनीषा विरुद्ध लोणीत आणखी एक गुन्हा दाखल
कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रवाना करण्यात आले. तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, अपघाताबाबत चौकशी सुरू असून, प्रथमदर्शनी कार झाडावर आदळल्याने अपघात झाल्याचे दिसून येत असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
मोक्कातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या