Friday, February 6, 2026
Homeनगरबस उलटून अपघात; दोघांचा मृत्यू

बस उलटून अपघात; दोघांचा मृत्यू

नगर- दौंड रस्त्यावरील घटना || चौघे जखमी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीला धडक दिल्यानंतर खासगी बस उलटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर इतर चार ते पाच प्रवासी किरकोळ स्वरूपात जखमी झाले. अपघात नगर-दौंड रस्त्यावर नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद फाट्याजवळ काल, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला.

- Advertisement -

अपघातातील मृतामध्ये बाबुर्डी घुमट गावातील भाऊसाहेब दगडू येवले व बस चालक या दोघांचा समावेश असल्याचे समजले. बस चालकाचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. बस (जीजे 05 बीयु 7717) दौंडहून नगरकडे येत होती व ती पुढे अहमदाबादला जाणार होती. बसमध्ये एकूण 10 ते 12 प्रवासी होते. बाबुर्डी बेंद फाट्याजवळ बसची प्रथम दुचाकीला (एमएच 16 बीडी 3458) धडक बसली.

YouTube video player

त्यानंतर बस रस्त्याच्या खाली जाऊन उलटली गेली. माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व 108 क्रमांकाची रूग्णवाहिकाही तेथे आली. त्यामधून जखमी व मृतांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. माहिती मिळतच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...