Friday, July 12, 2024
Homeनगरनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार

नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार

घारगाव |वार्ताहर| Ghargav

- Advertisement -

नगर-कल्याण महामार्गावर (Nagar Kalyan Highway) वाटखळे (ता.जुन्नर) (Vatkhale) गावाच्या हद्दीत पीकअप जीप (Pickup jeep) व छोटा हत्ती या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Accident) संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) एकाचा व छोटा हत्तीचा चालक या दोघांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना शनिवारी (12 मार्च) सकाळी आठच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, महिंद्रा पीकअप जीप (एमएच 14 ईएम 2384) व छोटा हत्ती (एमएच 14 जेएल 5769) यांची नगर-कल्याण महामार्गावर (Nagar Kalyan Highway) वाटखळे (ता.जुन्नर) गावच्या नजिक असणार्‍या वळणावर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (Accident) झाला. यात छोटा हत्तीमधील प्रवासी संदीप जयसिंग सुपेकर (वय 41, रा. नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) हे जागीच ठार झाले.

तर चालक अमर चंद्रकांत रोडे (वय 26, रा. धामणी, ता. आंबेगाव) हे गंभीर जखमी (Injured) झाले. त्यांना आळेफाटा (Alephata) येथील खासगी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू (Death) झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Loss) झाले असून दोन्ही अपघातग्रस्त वाहने ओतूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या