अकोले, पारनेर |तालुका प्रतिनिधी| Akole
नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आळेफाट्यावरून कल्याणच्या दिशेने जाणार्या बसची समोरुन येणार्या कारला समोरासमोर धडक झाली. हा अपघात रविवारी सकाळी सव्वा आठ वाजता झालेला आहे. या भिषण अपघातात कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. भाग्यश्री गायकर, कुसुम शिंगोटे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे नजिक कल्याणच्या दिशेने येणारी कार आणि नगरच्या दिशेने जाणारी खासगी बसची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या अपघातात कळंब येथील रिया गायकर व कुसुम शिंगोटे या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात काहीजण जखमी झाल्याची माहिती असून जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बस आणि कार रस्त्याच्या बाहेर जाऊन पलटी झाली होती.
क्रेनच्या सहाय्याने कार आणि बसला बाहेर काढण्यात आले आहे. ओतूर पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. कारमधील मयत – भाग्यश्री साहबराव गायकर (वय 18 रा. कळंब ता. अकोले जि अहमदनगर) (मयत), कुसुम मारूती शिंगोटे (वय 55 रा. बदगी बेलापुर ता.अकोले जि. अहमदनगर) (मयत), चालक साहील साहेबराव गायकर (वय 22 रा. कळंब ता. अकोले जि. अहमदनगर) (जखमी), साहेबराव रामदास गायकर (वय 42 रा. कळंब ता. अकोले जि. अहमदनगर) (जखमी), सविता साहेबराव गायकर (वय 38 रा. कळंब ता.अकोले जि. अहमदनगर) (जखमी ), सुनिता कारभारी हाडवळे (वय 57 रा. लिंगदेव ता. अकोले जि. अहमदनगर) (जखमी), टेंम्पो ट्रॅव्हल्स बस-चालक धनंजय स्वपन दास (रा. मुंबई), क्लिनर ससोदर सुमीदर दास मुंबई (जखमी) इतर 4 ते 5 करकोळ जखमी.