Wednesday, February 4, 2026
Homeनगरनगर-कल्याण महामार्गावर पथकाने प्रेशर कुकरचा ट्रक पकडला

नगर-कल्याण महामार्गावर पथकाने प्रेशर कुकरचा ट्रक पकडला

घारगाव |वार्ताहर| Ghargav

जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Junnar Assembly Election) सोमवारी प्रचाराची सांगता झाली असून 20 नोव्हेंबरला मतदान (Voting) पार पडणार आहे. जुन्नर निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली. त्यातच नगर-कल्याण महामार्गावर (Nagar Kalyan Highway) आणे एसएसटी पथकाने (Aane SST Team) सोमवारी दुपारी नाकाबंदी सुरु असताना प्रेशर कुकर घेऊन येणारा ट्रक (Pressure Cooker Truck) ताब्यात घेतल्या असून त्यामध्ये 1361 कुकर मिळून आले आहे. या पार्श्वभूमीवर आता आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत असून पुढील तपास केला जात आहे.

- Advertisement -

याबाबत आळेफाटा पोलिसांनी (Alephata Police) सांगितले, की नगर-कल्याण महामार्गावर (Nagar Kalyan Highway) आणे एसएसटी पथकाला एक ट्रक प्रेशर कुकर घेऊन येणारा ट्रक मिळून आला. त्याची बिल्टी चेक केली असता ट्रक लातूर (Latur) येथून अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्याच्या राहुरी (Rahuri) तालुक्यात माल पोहोच करण्यासाठी जाणार होता. मात्र ट्रक राहुरीकडे न जाता आळेफाटा दिशेने येत होता म्हणून संशय आला. त्यांनी ट्रक आळेफाटा पोलिसांच्या (Alephata Police) ताब्यात दिला असता पोलिसांनी चालकाकडे अधिकची चौकशी केली असता त्याने आळेफाटा येथे प्रेशर कुकरचा ट्रक (Pressure Cooker Truck) घेऊन येण्यास सांगितले असे सांगितले. ट्रकमधील 1361 प्रेशर कुकर आळेफाटा येथे काही लोकांना दिले जाणार असल्याने त्यांनी प्राथमिक तपासात पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी याबाबतची अधिक माहिती निवडणूक विभागाला दिली असून पुढील कारवाई केली जाणार आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik Fire News : सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग

0
सिन्नर | वार्ताहर | Sinnar तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी (Malegaon MIDC) परिसरातील मोहदरी वन उद्यानाजवळ असलेल्या “विमा ॲरोमॅटिक्स” या कंपनीला आज अचानक भीषण आग (Fire) लागल्याची...