अहमदनगर| Ahmednagar
नगर लोकसभा (Nagar Loksabha) मतदारसंघात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 53.34 टक्के मतदान (Voting) झाले. यात सर्वाधिक कर्जत-जामखेड तालुक्यात 57.20 टक्के होते.
- Advertisement -
त्याखालोखाल 56.64 टक्के राहुरी, नगर शहर 54.50 टक्के, शेवगाव 54.18 टक्के, श्रीगोंदा 51.20 टक्के आणि पारनेर तालुक्यात 46.60 टक्के मतदान झाले. यावेळी मतदारसंघातील 10 लाख 57 हजार 102 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 5 लाख 79 हजार 292 पुरूष तर 4 लाख 77 हजार 766 महिलांचा समावेश होता