अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर-मनमाड द्रुतगती रेल्वेमार्ग (Nagar-Manmad Expressway) प्रकल्पातंर्गत अंकाई किल्ला (Ankai Fort) ते मनमाड (Manmad) या 8 किलोमीटर अंतराची चाचणी मंगळवारी घेण्यात आली. या पूर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर होत आहे. गेल्या 3 वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) (Nagar-Manmad Doubleline) रेल्वे (Railways) मार्गाचे काम सुरू आहे.
यापूर्वी कोपरगाव (Kopargav) ते येवला (Yeola) व येवला ते अंकाई, अंकाई (Ankai) ते अंकाई किल्ला या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता मंगळवारी रोजी अंकाई किल्ला (Ankai Fort) ते मनमाड (Manmad) या 8 किलोमीटर डबल लाईन रेल्वेमार्गाची चाचणी घेण्यात आली. आता ऐकूण 43 किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती उपमुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार यांनी दिली.
मनमाड ते दौंड रेल्वेमार्ग इलेक्ट्रीक इंजीनचा (Manmad to Daund Railway Electric Engine) वापर करून डबल लाईन करण्यात येत आहे. तसेच या कामामुळे रेल्वे ताशी 120 प्रति किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उप मुख्य अभियंता दीपक कुमार,कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, सेकंशन सेक्शन अभियंता धर्मेंद्र कुमार, अभियंता सुद्धांसू कुमार या अधिकार्यांच्या उपस्थीतीत चाचणी पुर्ण करण्यात आली.
या चाचणीसाठी कॉन्ट्रॅक्टर एस.ए.यादव व त्यांचे सहकारी तुलसीदास बिराजदार, सुनिल हेगडे, प्रताप शेटे, दीपक येवले, सूरज लोहकने, वैभव क्षिरसागर, शुभम लांडे, राहुल जाधव, सुरेश वाघमारे, सूरज लोहकणे, शिवा कोणे, अमोल मुळे, किरण आहेर आदींनी परिश्रम घेतले.