Friday, April 25, 2025
HomeनगरAccident News : भीषण अपघात एकाचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

Accident News : भीषण अपघात एकाचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर- मनमाड रस्त्यावरील विळद घाटात एका भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात 26 मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला असून 30 मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पंकज शंभुराम राम (वय 24 रा. ड्रोली माठीयां, ता. दरोली, जि. सिवान, बिहार, हल्ली रा. विळद रेल्वे गेट जवळ) यांनी फिर्याद दिली आहे. अपघातात चंदन पनेश्वर राम (वय 34, रा. ड्रोली माठीयां, जि. सिवान, बिहार) याचा मृत्यू झाला आहे, तर विशाल यादव आणि राहुल चौहान (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 26 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास अहिल्यानगर- मनमाड रस्त्यावर विळद घाटात अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगईने, अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून तिघांना धडक दिली.

या धडकेत चंदन पनेश्वर राम यांचा मृत्यू झाला असून विशाल यादव व राहुल चौहान गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पंकज राम यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पितळे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...