Sunday, June 14, 2026
Homeनगरटँकर व दुचाकी अपघातात ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

टँकर व दुचाकी अपघातात ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

राहाता |वार्ताहर| Rahata

शहरात मंगळवारी सकाळी नगर-मनमाड महामार्गावर दुचाकी व टँकर यांच्यात भिषण अपघात झाला. टँकरच्या टायर खाली सापडून 33 वर्षीय साकुरी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ बनसोडे यांचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील भडांगे हॉटेलजवळ घडली. या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

सचिन योसेफ बनसोडे यांनी राहाता पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, भाऊ विश्वनाथ प्रकाश बनसोडे हा नगर-मनमाड रोडवरून राहाता पोलिस ठाण्याच्या जवळ असलेल्या चहाच्या दुकानाजवळून (एम एच 17 बी ए 6811 क्रमांकाची) दुचाकी घेऊन जात असताना रस्त्यावरून जाणार्‍या (क्रमांक एम एच 17 के 9045) दुधाच्या टँकरने जोरदार धडक दिल्याने तोल जाऊन भावाची दुचाकी टँकरच्या चाकाखाली आल्याने तो गंभीर जखमी होऊन रोडवर पडल्याने त्याच्या डोक्याला, पाठीला व पोटाला दुखापत झाली. पोलिसांच्या मदतीने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.

मंगळवारी सकाळी 11 वाजता शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गर्दीच्या ठिकाणी टँकर व दुचाकीचा अपघात झाल्याचा आवाज झाल्याने आजूबाजूच्या उपस्थित नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेऊन तत्काळ रुग्णवाहिकेला संपर्क केला. मात्र पोलिस ठाण्या समोर अपघाताची घटना घडून देखील राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी तात्काळ पोहोचू शकले नाही. अपघाताची माहिती मिळूनही पोलिसांनी या ठिकाणी येण्यास उशीर केल्याने नागरिकांनी पोलिसांवर नाराजी दर्शवली आहे.

ताज्या बातम्या

महिला टी-20 विश्वचषक २०२६ : भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय

0
महिला टी-20 विश्वचषक २०२६ मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६४ धावांनी शानदार विजय मिळवत स्पर्धेतील मोहिमेची दमदार सुरुवात केली. बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर झालेल्या या...