कोल्हार |वार्ताहर| Kolhar
राहुरी (Rahuri) तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे नगर मनमाड महामार्गावर (Nagar Manmad Highway) पुलाजवळ मालवाहतूक करणारा एक ट्रेलर अज्ञात वाहनावर पाठीमागून धडकला. यामुळे ट्रेलरच्या अग्रभागाचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने यात चालक बालंबाल बचावला. मात्र या अपघातामुळे (Accident) पहाटेपासून दुपारपर्यंत महामार्गावर तब्बल 7 तास वाहतूक खोळंबली. वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कोल्हारमध्ये (Kolhar) वाहतुक ठप्प होणे हा काही नवीन प्रकार नाही. एखादा अपघात (Accident) झाला किंवा पुलावर एखाद्या वाहनात बिघाड झाला की, येथे तासनतास वाहतूक रेंगाळण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. असाच प्रकार गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडला. गुरुवार असल्याने शिर्डी (Shirdi) येथे साईबाबा दर्शन तसेच शनिशिंगणापूर (Shanishingnapur) येथे शनी दर्शनासाठी प्रवाशांच्या वाहनांची अधिक गर्दी होती. त्यात ल्या अपघाताने महामार्गावरील वाहतुकीचे तीन तेरा वाजले.
पहाटेच्या सुमारास शिर्डीच्या (Shirdi) दिशेने अवजड माल घेऊन चाललेला ट्रेलर (आरजे 47 जीए 3214) समोरच्या एका अज्ञात वाहनावर पाठीमागून धडकला. धडक इतकी जबर होती की, त्यामुळे या ट्रेलरच्या अग्रभागाचा चक्काचूर झाला. प्रचंड नुकसान झाले. धडक बसलेले दुसरे वाहन रात्रीच तसेच पुढे निघून गेले. मात्र धडकलेल्या या ट्रेलरचा बिघाड होऊन तो जागीच बंद पडला. महामार्गावर ट्रेलर धडकून बंद पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. त्यातून वाहतूक ठप्प झाली. यामुळे सकाळपासूनच प्रवासी, वाहन चालक, स्थानिक ग्रामस्थ, नोकरदार वर्ग, महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी यांचे प्रचंड हाल झाले. यानंतर क्रेनच्या साह्याने हा ट्रेलर बाजूला करण्यात आला. पोलिसांनी (Police) वाहतूक सुरळीत केली. बराच काळ रेंगाळलेल्या या रहदारीत एक म्बुलन्सदेखील अडकली होती. तातडीने रुग्णास नगरकडे नेऊ पाहणार्या या रुग्णवाहिकेला वाट काढताना प्रचंड मेहनत घ्यावी लागली.