Wednesday, January 28, 2026
HomeनगरAccident News : प्रजासत्ताकदिनी झालेल्या तीन अपघातात एक ठार तर पाच जखमी

Accident News : प्रजासत्ताकदिनी झालेल्या तीन अपघातात एक ठार तर पाच जखमी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहराच्या हद्दीत सोमवार 26 जानेवारी प्रजाकसत्ताक दिनी दिवसभरात नगर-मनमाड महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झाले. या अपघातांमध्ये एक ठार तर पाच जण जखमी झाले. गोटुंबा आखाडा येथील संकेत सखाराम बाचकर (वय 18) आणि श्रीकांत हापसे हे दोन महाविद्यालयीन तरुण 26 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजे दरम्यान राहुरी कॉलेज येथे झेंडावंदन करून दुचाकीवर आपल्या घरी जात होते. दरम्यान राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळेसमोर त्यांच्या दुचाकीला टीएन 29 बीझेड 3381 या नंबरच्या मालट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली.

- Advertisement -

यावेळी संकेत बाचकर हा दुचाकीवरून पडून मालट्रकच्या चाकाखाली सापडला. मालट्रकचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला तर श्रीकांत हापसे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संकेत बाचकर हा लोणी येथे कृषी पदवीधर शिक्षण घेत होता. तर श्रीकांत हापसे हा राहुरी कॉलेज येथे शिक्षण घेत आहे. या घटनेमुळे गोटुंबा आखाडा परिसरात शोककळा पसरली आहे. संकेत याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. संकेत याचे वडील सखाराम बाचकर हे स्कूल बसवर चालक म्हणून काम करतात.

YouTube video player

राहुरी बसस्थानकासमोर दुसरा अपघात झाला. त्यात कानडगाव येथील प्रसाद शरद गागरे (वय 18) आणि सार्थक कैलास आहेर (वय 19) हे दोन तरुण दुचाकीवर कानडगाव येथून डोंगरगण येथे जात होते. दरम्यान राहुरी बसस्थानक समोर त्यांच्या दुचाकीला एका आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. यात प्रसाद गागरे हा गंभीर जखमी झाला. तर सार्थक आहेर हा किरकोळ जखमी झाला. तिसरा अपघात राहुरी कॉलेज जवळ झाला. यामध्ये दोन युवक जखमी झाले.

राहुरी शहरात नगर-मनमाड महामार्गावर तीन ठिकाणी झालेल्या अपघातात एक कॉलेज तरुण जागीच ठार तर पाचजण गंभीर जखमी झाले असून या घटनांमुळे मयत व जखमी तरुणांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत नगर-मनमाड राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : शब्दाचा पक्का, कामाचा झंझावात; महाराष्ट्राच्या राजकारणातील एक...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी आज (बुधवारी) बारामतीमध्ये एका भीषण विमान...