Wednesday, February 4, 2026
HomeनगरAccident News : नगर-मनमाड महामार्गावरील अपघातात तरूणाचा मृत्यू

Accident News : नगर-मनमाड महामार्गावरील अपघातात तरूणाचा मृत्यू

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

नगर-मनमाड महामार्गावरील (Nagar Manmad Highway) अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवार दि. 10 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावरील वांबोरी फाटा येथे झालेल्या अपघातात (Accident) सागर साहेबराव रंधवे (रा.अगस्थान, ता. पाथर्डी,) या 29 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू (Youth Death) झाला आहे.

- Advertisement -

याबाबत समजलेली माहिती अशी, सागर रणदिवे हा वरवंडी येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान सागर हा पुन्हा नगरच्या दिशेने दुचाकीवरून (Bike) घरी जात असताना असताना त्याच्या दुचाकीला मालवाहतूक ट्रकने जोराची धडक (Truck Hit) दिली. या अपघातात वाहनाचे चाक थेट सागरच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून, घटनास्थळाचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.गेल्या 10 दिवसांत नगर-मनमाड महामार्गावर हा चौथा बळी गेल्याने हा रस्ता प्रत्यक्षात मृत्यूचा सापळा बनल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

YouTube video player

दरम्यान दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी राहुरी फॅक्टरी येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले होते. आंदोलन संपल्यानंतर काही तासांतच पुन्हा एका तरुणाचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...