राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
नगर-मनमाड महामार्गावर (Nagar Manmad Highway) शिर्डीहून अहिल्यानगरकडे सफरचंद घेऊन जाणारा (Apple Truck) मालट्रक राहुरीतील गाडगे महाराज आश्रम शाळेसमोर महामार्गावरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने व स्टेअरींग रॉड तुटल्याने नियंत्रण सुटून पलटी (Accident) झाल्याची घटना आज (शनिवार) दि. 26 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. यामुळे महामार्गावर सफरचंदाचा खच पडला होता. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
सदर घटनेची माहिती पोलीसांना मिळताच रात्रीच्या गस्तीवर असणार्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एकेरी वाहतूक वळविण्यात आली आणि सकाळपर्यंत मालट्रकमधील सफरचंदाचे (Apple) खोके काढून क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त (Accident) मालट्रक बाजूला घेण्यात आला. यापूर्वीही याच ठिकाणी वाहने पलटी होण्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी गतीरोधकच्या सूचना फलक व दिशादर्शक नसल्याने वाहन चालकांना गतीरोधक व मोठे वळण असल्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघात घडतात.
येथील गतिरोधक महामार्गावरील वाहनांची गती कमी होऊन वाहने व नागरीकांसाठी महामार्ग ओलंडल्या करता आहे. मात्र हे गतिरोधक महामार्गावरील जड वाहतुकीमुळे सपाट झाले आहे. याठिकाणी बाजूला झेब्रा क्रॉसिंग नाही, पांढरे पट्टे नाहीत, रेडियम देखील नाहीत. ते असणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहन चालकांना गतीरोधकाचा अंदाज येत नसल्याने नियंत्रण सुटून नेहमी अपघात होत असतात. काल पुन्हा ज्या ठिकाणी मालट्रक पलटी झाल्याने महामार्गावरील गतीरोधकांची दुरूस्ती करून सूचना फलक लावण्याची मागणी नागरीकांमधून होत आहे.





