Thursday, October 15, 2026
HomeनगरAccident News : नगर-मनमाड महामार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Accident News : नगर-मनमाड महामार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नगर-मनमाड राज्य महामार्गावर (Nagar Manmad Highway) अपघातांची मालिका सुरूच असून, आणखी एका अपघातात (Accident) एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. राहुरी शहरातील नगर-मनमाड रोडवर बुधवार, दि. 14 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी दुचाकी (Bike) आणि कंटेनर (Container) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 44 वर्षीय मोटारसायकलस्वाराचा मृत्यू (Death) झाला. आबासाहेब चांगदेव पठारे (वय 44, रा. शिंगवे, ता. राहाता) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आबासाहेब पठारे हे बुधवारी सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त दुचाकीवरून अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे जात होते. दरम्यान, नगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरी शहर हद्दीत हॉटेल सर्जा समोर जीजे 19 झेड 0440 क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात पठारे गंभीर जखमी झाले. अपघाताची (Accident) माहिती मिळताच रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना राहुरी (Rahuri) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

आबासाहेब पठारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, राहुरी पोलिसांनी अपघातातील कंटेनर ताब्यात घेतला असून, राहुरी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; सार्वजनिक रस्ते आणि गल्लीबोळात वर्षभर फटाके फोडण्यावर...

0
​मुंबई | प्रतिनिधी नवरात्रोत्सव, आगामी दिवाळी आणि ख्रिसमससह सर्वच सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यावर आता वर्षातील सर्व ३६५ दिवस बंदी लागू...