Thursday, March 13, 2025
Homeनगरदुचाकी व एसटी बसच्या अपघातात तरूण ठार

दुचाकी व एसटी बसच्या अपघातात तरूण ठार

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड महामार्गावरील (Nagar-Manmad Highway) डिग्रस फाट्याजवळ सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान दुचाकी व एसटी बसच्या झालेल्या भीषण अपघातात (Bike and ST Bus Accident) युवराज भुजाडी हा तरूण ठार (Youth Death) झाल्याची घटना घडली. जोगेश्वरी आखाडा येथील युवराज कैलास भुजाडी (वय 21) हा सुमारे तीन ते चार महिन्यापूर्वी नगर एमआयडीसी (MIDC) येथील एका कंपनीत कामाला लागला होता. तो दररोज त्याच्या दुचाकीवर ये-जा करत असे.

- Advertisement -

सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजे दरम्यान युवराज भुजाडी हा नेहमी प्रमाणे त्याच्या दुचाकीवर नगर एमआडीसी येथे कामाला जात असताना नगर-मनमाड महामार्गावरील (Nagar-Manmad Highway) डिग्रस फाट्याजवळ एकेरी वाहतूक असलेल्या ठिकाणी त्याच्या दुचाकीला समोरून येणार्‍या एसटी बसची जोराची धडक (Hit) बसली. या धडकेत युवराज भुजाडी हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे वैद्यकिय आधिकार्‍यांनी घोषित केले. याचे शवविच्छेदन केल्यानंतर काल दुपारी 3 वाजता जोगेश्वरी आखाडा येथे त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षापासून नगर-मनमाड रस्त्याचे (Nagar-Manmad Highway) चौपदरीकरणाचे काम कासव गतीने सुरू आहे. या दरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता खोदून एकेरी वाहतूक सुरू केल्याने मोठ्या प्रमाणांवर झालेल्या अपघातात (Accident) अनेकांचे बळी गेले आहे. यासाठी अनेक आंदोलने झाली. मात्र या रस्त्याचे काम संथ गतीनेच सुरू आहे. काल डिग्रस फाट्यावर झालेल्या अपघातात (Accident) युवराज भुजाडी हा एकेरी वाहतूकीचा बळी ठरल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...